अश्‍लील मेसेज पाठविणार्‍या इसमावर गुन्हा दाखल

0

पुणे । फोनवर अश्‍लिल संभाषण करून व्हॉट्सअ‍ॅपवर अश्‍लिल मेसेज आणि चित्रफीत पाठवून विवाहीत महिलेकडे शारिरीक सुखाची मागणी करणार्‍या इसमाच्या विरोधात पुण्यातील खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी एका 39 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

राहुल कुलकर्णी उर्फ संदीप कोळेकर असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे. फिर्यादी महिला व्यावसायिक असून कोळेकरने या महिलेकडे व्यवसायात भागीदार होण्यास गळ घातली होती. परंतु तिने नकार दिल्यानंतर तिच्याशी फोनवर संपर्क साधत अश्‍लील बोलून शरीरसुखाची मागणी केली. यावरच तो थांबल नाही तर तिच्या व्हॉट्सअ‍ॅपवर वारंवार अश्‍लिल छायाचित्रे आणि व्हिडीओ पाठवत होता. त्याने फिर्यादी महिलेकडे 10 हजार रुपयांचीही मागणी केली आणि पैसे दिले नाही तर बदनामी करण्याची धमकी दिली. अखेर महिलेने या सर्व प्रकाराला कंटाळून खडक पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधत तक्रार दिली आहे. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संभाजी शिर्के याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.