शहादा। श.ता.एज्युकेशनल सोसायटी अॅण्ड को.ऑप एज्युकेशनल सोसायटी लि.संचलित एस.एन.डी.टी.महिला विद्यापीठ, मुंबई संलग्नित सिनिअर आर्टस् महिला महाविद्यालयातील कु.गिरासे अश्विनी ही 73.25 टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळविला.
तसेच कोळी ममता (69.50), शेल्टे शितल (68.08) मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या.तसेच मराठी विभागात जोशी गायत्री ही प्रथम, ठाकरे रूपाली द्वितीय तर चौरे जयश्री ही तृतीय आली. इतिहास विभागातून शेल्टे शितल प्रथम, वसावे नंदा द्वितीय तर पटेल रिद्धी तृतीय आली. तसेच बी.ए.भाग दोन मध्ये वाडिले तेजस्विनी प्रथम, वाडीले ज्योती द्वितीय तर बहिरम दर्शना ही तृतीय आली. बीए भाग एक मध्ये महिदे शुभांगी प्रकाश प्रथम, कोळी विद्या राजू द्वितीय तर चौधरी मोनिका नितीन तृतीय आली. त्याचबरोबर बीसीए प्रथम वर्षात गाडीलोहार सुनयना संजय प्रथम, कोळी वंदना दिलीप द्वितीय तर तृतीय जाधव विशाखा नरेश आली. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थीनींचे अभिनंदन संस्थेचे चेअरमन व सभासदांंनी केले.