मुंबई | माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘रंगभूमी ते चित्रपट क्षेत्रातील माझा प्रवास’ या विषयावर अष्टपैलू अभिनेते अरूण नलावडे यांच्या मुलाखतीचा पहिला भाग दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होणार आहे. ही मुलाखत शुक्रवार, ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.३० ते ८ या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका मनाली दीक्षित यांनी ही मुलाखत घेतली आहे.
मराठी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शन मालिका या तिन्ही माध्यमातून अतिशय सकसपणे भूमिका साकारणारे अष्टपैलू अभिनेते म्हणून अरुण नलावडे यांना ओळखले जाते. राज्य शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने ‘चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्काराने’ त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. श्री. नलावडे यांनी विविध सामाजिक आशय असलेल्या भूमिका चित्रपटातून साकारल्या आहेत. रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शन मालिका क्षेत्रातील प्रवासाची संपूर्ण माहिती नलावडे यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे.