अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाणला बीसीसीआयचा दणका

0

मुंबई : अष्टपैलू क्रिकेटर युसूफ पठाणला बीसीसीआयने दणका दिला आहे. बीसीसीआयने युसूफ पठाणला हाँगकाँग टी 20 क्रिकेट लीगमध्ये खेळण्यास परवानगी नाकारली आहे. हाँगकाँग टी 20 क्रिकेट लीगमध्ये खेळण्यास परवानगी नाकारत बीसीसीआयने भारताचा अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाणला चांगलाच झटका दिला आहे. विशेष म्हणजे बीसीसीआयने आपल्याला हाँगकाँग टी 20 क्रिकेट लीगमध्ये खेळण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र दिले असल्याचा दावा युसूफ पठाणने केला होता. पण असे कोणतेच प्रमाणपत्र दिले नसल्याचे बीसीसीआयचे म्हणणे आहे. हाँगकाँग ट्वेन्टी ट्वेन्टी लीगच्या दुसऱ्या सत्राला 8 मार्चपासून सुरुवात होणार आहे.

कॅन्टॉन्सचा सर्वात महागडा खेळाडू

युसूफ हा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून हाँगकाँग लीगमध्ये खेळणार होता. मात्र ती टी 20 लीग असल्यामुळे त्याला नाहरकत प्रमाणपत्र दिले नाही, असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे. या लीगमध्ये युसूफ पठाण कोवलून कॅन्टॉन्सचे प्रतिनिधित्व करणार होता. पाकिस्तानचा शाहीद आफ्रिदी आणि इंग्लंडचा टायमल मिल्स यांच्यानंतर युसूफ पठाण हा कोवलून कॅन्टॉन्सचा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. युसूफ हा ब्रँड अम्बेसेडर म्हणून हाँगकाँग लीगमध्ये खेळणार होता, मात्र ती टी 20 लीग असल्यामुळे त्याला नाहरकत प्रमाणपत्र दिले नाही, असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. हाँगकाँग ट्वेन्टी ट्वेन्टी लीगच्या दुसऱ्या सत्राला 8 मार्चला सुरुवात होणार आहे. 12 मार्चपर्यंत ही स्पर्धा रंगेल. या स्पर्धेत 4 संघ सहभागी झाले आहेत. पहिल्या चार दिवसात साखळी सामने होतील, त्यानंतर 12 मार्चला फायनल होईल.