अष्टभुजा जेष्ठ नागरिक संघातर्फे कामगारांचा सत्कार

0

भुसावळ। राज्याचा स्थापना दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधुन येथील अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने नवशक्ति आयुर्वेदालय कारखान्यातील 25 कामगारांचा गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पोपटराव पाटील होते. तर प्रमुख अतिथी म्हणुन रोटरी डीजीआरडीचे महेश मोखाडकर, राजीव शर्मा, मुकेश अग्रवाल, दिनानाथ ओगले, हरिमकर, पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय कामगार दिन अनेक देशांमध्ये साजरा केला जातो.

मान्यवरांनी केले मार्गदर्शन
जगभरातील कामगारांच्या कार्याच्या सन्मानार्थ हा दिवस समर्पित आहे असे अध्यक्ष पोपटराव पाटील यांनी सांगितले. देशात श्रमिकांच्या प्रश्‍नांची मांडणी कामगार चळवळीचे अग्रदूत नारायण मेघाजी लोखंडे यांनी दिनबंधु या साप्ताहिकातुन केली होती असेही पाटील यांनी सांगितले. प्रमुख अतिथींच्या हस्ते 25 कामगारांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन जी आर ठाकुर यांनी केले. पसायदान व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.