असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा कायदा लागू

0

जळगाव। मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस संघटनेतर्फे असंगठीत कामगारांसाठी समाजिक सुरक्षा कायदा 2008 लागू करण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. असंघटीत क्षेत्रात कामगारांना कोणत्याही सेवाशर्थी लागू नसतात.

याकामगारांना मजूरीव्यतिरिक्त इतर कोणत्याही सुविधा मिळत दिल्या जात नाही. त्यांना सामाजिक सुरक्षा दिली जात नाही तसेच ओव्हरटाईम दिला जात नसल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे. योजनांचा लाभ देतांना दारिद्र रेषेखालील अथवा दारिद्ररेषेवरील असाभेदभाव न करता सर्व असंघटीत कामगारांना लाभ देण्यात यावेत अशी मागणी केलेली आहे. असंघटीत कामगारांना इएसआय, राष्ट्रीय आरोग्य विमा योजना, टर्मिनल रोगांना कव्हर करणे आणि कव्हरेज 1 लाखापर्यंत वाढविण्याची मागणी करण्यात आलेली आहे. निवेदन देतांना उपाध्यक्ष मेहमूद खान, शहर अध्यक्ष अनवर शेख, तालुका अध्यक्ष वसीम अख्तर, शहर उपाध्यक्ष शेख नईम, माजीद खान, नियामत खान, अशफाक खान, उरूज फारूखी उपस्थित होते.