असंघटीत कामगारांनी अटल विश्वकर्मा सन्मान योजनेचा लाभ घ्यावा

0

आमदार संजय सावकारे ; भुसावळात दुकाने निरीक्षक कार्यालयात नोंदणीला सुरूवात

भुसावळ- राज्य सरकारने असंघटीत बांधकाम व अन्य कामगारांच्या हितासाठी अटल विश्वकर्मा सन्मान योजना सुरू केली असून असंघटीत कामगारांनी अटल विश्वकर्मा सन्मान योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार संजय सावकारे यांनी येथे केले. शनिवारी सकाळी 11 वाजता जुन्या पालिका कार्यालयातील कामगार विभागाच्या दुकाने निरीक्षक कार्यालयात जनजागृती व नोंदणी रथाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. आमदार सावकारे म्हणाले की, कामगार विभागातर्फे बांधकाम व अन्य कामगारांची नोंदणी केली जात असून 28 श्रेणीत काम करणार्‍या कामगारांची नोंदणी केली जाणार आहे. राज्यभरात ही नोंदणी सुरू असून भुसावळ, बोदवड व जामनेर या तीन तालुक्यातही नोंदणी महिनाभर सुरू राहणार आहे. या कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून त्यांच्यासह कुटूंबियांना शैक्षणिक सहाय्य, आर्थिक सहाय्य, आरोग्य, सामाजिक सुरक्षेसह अन्य योजनांचे लाभ मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. क्रांती मिशन कामगार संघटनेचे अध्यक्ष सरजू तायडे यांनी सुमारे 300 कामगारांची नोंदणी केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

यांची होती प्रसंगी उपस्थिती
या प्रसंगी दुकाने निरीक्षक ए.एम.सौदागर, युनूस तडवी, सरजू तायडे, एस.बी.नाईक, प्रवीण नवगिरे, युनूस पिंजारी, नरेंद्र परदेशी, रुपेश निकम, युनूस मुन्तेजर, समाधान बोदडे, राजु पवार, मनोज तायडे, कलिम मिस्त्री, अकील शाह, हनोक घोरपडे, रऊफ खान, रॉनी विल्सन, प्रमोद महाजन, लक्ष्मण तायडे, देविदास परदेशी, सुपडू भालेराव, राजेंद्र परदेशी, मनोज तायडे, राघव मुसळे, मनोज परदेशी, देवेंद्र पोंगल्लु, दिलीप भालेराव, राजू खरे आदी उपस्थित होते.