असलोदला कोरोना संशयित ‘त्या’ दोघांचा अहवाल निगेटिव्ह

0

असलोद:शहादा तालुक्यातील असलोद येथील दोन व्यक्ती मंदाणा येथील कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कात आले होते. त्या दोघांना कोरोना झाल्याचा संशय निर्माण झाल्याने दोघांचे स्वॅब नमुने घेन्यात आले. एकाचा खासगी लॅबमध्ये तर एकाचा शासकीय आरोग्य विभागामार्फत नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्या दोघांचा निगेटिव्ह रिपोर्ट आल्याने असलोद गावातील जनतेने सुटकेचा श्‍वास घेतला आहे.
निगेटिव्ह आलेल्या दोघांचा संपर्क बर्‍याच लोकांशी झाला असल्याने गावात चिंतेचे वातावरण पसरले होते. या दोघांचे नमुने लॅबमध्ये पाठवले तेव्हापासून असलोद ग्रा.पं.ने याच्या राहत्या घरासह त्यांची सर्व गल्ली लॉकडाऊन केली होती. सर्व गल्ली सॅनेटायझर करण्यात आली होती. गावात रिपोर्ट येईपर्यत अत्यावश्यक दुकाने सोडून सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. खबरदारीचा उपाय म्हणून गावात दवंडी देवुन सर्व जनतेला सतर्क करण्यात आले होते. दोघांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने ग्रामपंचायतीने सर्वांना पुढील पंधरा दिवस सर्व जनतेला मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. नेहमी घरी गेल्यावर साबणाने हात धुणे व नियमित सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शासनाच्या वेळोवेळी आलेल्या सुचनांचे जनतेने पालन करावे, असे आवाहन ग्रामसेवक मुकेश जाधव यांनी केले आहे.