असलोद परीसरात अस्वच्छता

0

असलोद । केंद्र व राज्य शासन स्वच्छतेला महत्त्व देवून स्वच्छता अभियान संपूर्ण देशात राबवित आहे. मात्र, याला शहादा तालुक्यातील असलोद हे गावात अपवाद ठरत आहे. गावांत सर्वत्र घाण पसरली आहे. गावामध्ये शाळेच्या समोरील पटांगणात देखील अस्वच्छता पसरून घाण तयार झाली आहे. यातून विद्यार्थ्यांचे आरोग्य धोेक्यात आले आहे. यासोबतच फॉरेस्ट नाका, पिण्याचा टाकीचा परीसर, सार्वजनिक विहीरच्या आजूबाजूचा परिसर येथे देखील अस्वच्छता आहे. तर काही गल्लींमध्ये गटरीचे पाणी साचत असून यातून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. गावात अस्वच्छता असल्याने दुर्गंधी पसरली आहे.

विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात
जिल्हा परीषद मराठी शाळेच्या गेटच्या समोरील पंटागणात मोठ मोठे गाजर गवत वाढलेले आहे. काही ठिकाणी मोठ मोठे झुडपे देखील वाढलेले आहेत. या पंटागणात शासनाच्या निधीच्या पैशातुन खोल्या बाधलेल्या आहेत. त्या खोल्या ओसाड पडल्या आहेत. जिल्हा परीषद मराठी शाळा या खोल्यांचा कोणत्याही उपयोग घेत नसल्याने खोल्यांच्या आजुबाजुस अस्वच्छता, घाण पसरली आहे. शाळा परिसरातच अस्वच्छता असल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आलेे आहे.

पावसाळ्यापुर्वीची सफाई नाही
गावांत पावसाळ्यापूर्वी ग्रामपंचायतीतर्फे पुर्णतः गटारी साफ करण्यात आली नव्हत्या. याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. गटारी साफ न केल्याने पावसाचे पाणी गटारीतून न जाता ते पाणी गल्लींमधून वाहून निघत आहे. पावसाच्या पाण्यासोबत गटारींमध्ये काडी कचरा गेल्याने गटारी घाणीने तुडूंब भरल्या आहेत. गटारीचे पाणी तुंबल्याने तेथे डासांचा प्रादुर्भांव वाढला आहे. गटारीत पाणी साचल्याने दुर्गंधी येण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यातच सेंट्रल बँकेच्या जवळील आजुबाजुच्या दोन्ही गटारी घाणीने पुर्ण भरल्या आहेत. प्रत्येक वार्डांत जवळपास अशीच परिस्थिती आहे. गटारींमध्ये काडी कचरा भरल्याचे दिसून येत आहे.

उघड्यावर शौचास गेल्याने दुर्गंधीत वाढ
हगणदारीमुक्तीसाठी घरा घरात शौचालय उभारणीसाठी शासनाकडून निधी जात आहे. जिल्हा परिषदच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे याचे वितरण करण्यात येत असते. मात्र, गावांत शौचालय नसल्याने महिलांना उघड्यावर शौचास जावे लागत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरत आहे. या दुर्गंधीचा त्रास रस्त्यांवरून ये-जा करणार्‍यांना नेहमी सहन करावा लागत आहे. हगणदारीमुक्ती अभियानाची कोणतेही काम होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.