असलोद। असलोद बस स्टँड पासुन ते दुधखेडा रस्त्यावरील फरशी पर्यंत दोन ते तीन किलोमिटर अतरांच्या स्त्याची दुरावस्था झाली आहे. त्या रस्त्यावरूण येणार्या जाणार्या वाहनांना मोठया प्रमाणात कसरत करावी लागत आहे. असलोद परिसरातील दुधखेडा,मानमोडा,भुलाने, लंगडी, मलगाव, घोटाळी या गावातील नागरीक रस्त्यांची दुरूस्ती करण्याची मागणी करीत आहेत.असलोद बस स्टॉपपासुन ते दुधखेडा फरशी पर्यंत बांधकाम विभागमार्फत डांबरीकरण रस्ता करण्यात आला होता. हा तीन किलोमीटर रस्ता असलोद गावाला लागुन आहे.
रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे पडले आहे.असलोद गावाच्या गाव-विहीरीजवळ रस्ता सोडुन रस्त्याच्या बाजुने वाहनांचा वापर सुरू आहे.गावातील गटारीचे पाणी नेहमी याठिकाणी येत असल्याने ते पाणी रस्त्यातच नेहमी साचत असते. त्यामुळे लहान वाहनांना व मोटरसायकलवाल्यांना रस्त्याने न जाता रस्त्याच्या साईडपट्टीवरून जावे लागत आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर दरवर्षी वाहनांचा वापरामुळे रहदारी जास्त आसल्याने रस्त्याची दुरावस्था होत असते.