न्यूयॉर्क : प्रसिद्ध अमेरिकन गायक व हॉलिवूड अभिनेता अशर याला असुरक्षित शरीरसंबंध चांगलेच महाग पडले आहेत. त्याच्या संपर्कामुळे महिलेला झालेल्या विषाणूजन्य लैंगिक रोगामुळे अशरला १.१ दशलक्ष डॉलर म्हणजे जवळजवळ साडे सहा कोटी रूपये इतका दंड ठोठावण्यात आला आहे.
ओएमजी, डीजे गॉट यूएस फॉलन इन लव, याह अशी अशरची गाणी आहेत. हँग ओव्हर, फास्ट अँड फ्युरिअस, मपेट्स मोस्ट वॉन्टेड या चित्रपटांमध्येही त्याने काम केले आहे.
रडार ऑनलाईनने न्यायालयातून एक कागदपत्र लिक केले त्यात अमेरिकी गायकाला त्वचेसंबंधी आजार जडल्याचा उल्लेख आहे. अशरने शरीरसंबंध ठेवलेल्या महिलेला नंतर कळले की तिला हर्पिस या रोगाची लागण झाली आहे. हा रोग लैंगिक संबंधातूनच पसरतो. ३८ वर्षाच्या असरने सुरक्षित संबंध ठेवले असते तर तिला विषाणूजन्य रोग झाला नसता. असरला मात्र या साऱ्याचा पश्चाताप होत असल्याचे हॉलिवूड लाईफ नियतकालिकाला त्याने सांगितले आहे.