भुसावळ । जंक्शन शहरातील नगरपालिकेचे रुग्णालय केवळ ’शो पीस’ ठरत असून डॉक्टरांसह औषधांची कमतरता असल्याने सर्वसामान्य रुग्णांचे अतोनात हाल होत असल्याने सत्ताधारी व मुख्याधिकारी यांनी दखल घ्यावी, अशी मागणी शहर शिवसेनेतर्फे मुख्याधिकारी प्रशासनास मंगळवारी करण्यात आली. गोरगरीब रुग्णांसाठी पालिकेचे रुग्णालय आश्रयस्थान असलेतरी आजघडीला या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर्स नाहीत व औषधांची उपलब्धीदेखील नाही.
शवविच्छेदनाअभावी प्रचंड हाल
पालिकेच्या रुग्णालयात शवविच्छेदन होत नसल्याने शहरवासीयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मृतदेह जळगाव वा वरणगाव रुग्णालयात हलवावा लागत असल्याने प्रचंड मनस्ताप सोसावा लागतो. पालिकेच्या रुग्णालयात शवविच्छेदनाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय अधिकार्याची नेमणूक करावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदन देताना यांची होती उपस्थिती
निवेदनावर शिवसेनेचे शहररप्रमुख तथा नगरसेवक मुकेश गुंजाळ, उमाकांत (नमा) शर्मा, राकेश खरार, प्राचार्य विनोद गायकवाड, अरुण साळुंके, मिलिंद कापडे, धीरज पाटील, कृष्णा साळी, शुभम पचेरवाल, निखील सपकाळे, सोनू पाटील, किरण जोहरे, मनीष केदारे, गणेश काळे, राजेश ठाकूर, शेख अबजूर, शिवाजी दाभट, गोकुळ बाविस्कर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या स्वाक्षर्या आहेत.