असलोद । शहादा तालुक्यातील असलोद गावात पाणी पुरवठा बंद अवस्थेतील दुरावस्था झालेली जुनी पाण्याची टाकी होती. ती टाकी कोसळण्या स्थिती असल्याने परीसरातील लोकांना भिती वाटत होती. यामुळे जिवीत हानी होण्याचा संभव होता. या टाकीची बर्याच वर्षापासुन कोणीही दखल घेत नव्हते. त्या दुरावस्था झालेली टाकीच्या विषया संबधी दै. जनशक्ति वृत्तपत्रात बातमी छापुन आली होती. या बातमची दखल घेत असलोद ग्रांमपंचातीने त्वरीत ग्रांमपंचायत कार्यकारणीत ठराव करुन पाण्याची टाकी पाडण्याचा निर्णय घेण्यात आला व टाकी जेसीबीच्या सहाय्याने नेस्तनाबुत करण्यात आली.
ड्रिल, जेसीबीचा करण्यात आला उपयोग
या दुरावस्था झालेल्या टाकीचा विषय गेल्या एक वर्षांपासुन प्रंलबीत होता. टाकी पाडण्याचा विषय ग्रांमपंचायत संदस्यानी बर्यचा वेळेस ग्रांमसभेत देखील उपस्थित केला होता. तरी देखील गा्रंमपंचायतीने दुरावस्था झालेल्या टाकीकडे लंक्ष दिले नाही. या टाकीच्या परीसरात संप्तश्रृगी माता व नागेश्वर मंदीरे आहेत. यामुळे या परीसरात नेहमी लोकांची रहदारी असायची. यामुळे विषयाचे गांर्भीय घेत जनशक्तीच्या प्रतीनीधीनी याबाबत दखल घेतली व लोकांच्या मागणीकडे ग्रांमपंचायतीचे लक्ष वेधण्यासाठी वृत्तपत्रात बातमी दिली. या बातमीची ग्रांमपंचायतीने दखल घेतली व टाकी पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. टाकी पाडण्याचा ठेका देण्यात आला. ठेकेदाराने ड्रिलच्या सहाय्याने टाकीचा खालचा भाग कोरुन कमकुवत केला व टाकीच्या वरच्या भागास जाड पंट्टा बांधुन जेसीबीच्या सहाय्याने पट्टा ओढुन टाकी पाडण्यात आली. टाकी पाडण्यासाठी एक तासाचा अवधी लागला. टाकी पाडतांना बघण्यांसाठी लोकांची मोठी गर्दी रस्त्यावर जमली होती. ग्रांमपंचायतीने दुरावस्था झालेली पाण्याची टाकी पाडल्याने परीसरातील नागरीक समाधान व्यक्त करीत आहे.