अस्तित्व ग्रुपतर्फे अथर्वशिर्ष पठन स्पर्धा

0

नवापूर। शहरातील अस्तित्व ग्रुपतर्फे गणपती अथर्वशिर्ष उपक्रम गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थीपर्यंत रोज प्रत्येक मोठया गणेश मंडळाजवळ अथर्वशिर्ष अस्तित्व ग्रुप भगिनीतर्फे म्हटले जात आहे. त्या भागातील व गावातील भगिनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित असतात.

रोज नवीन विषय प्रश्न व वेगवेगळे खेळ घेतले जातात. विजेत्यांना बक्षिस दिले जातात. या खेळांमध्ये महिला अगदी उत्साहाने सहभागी होतांना दिसत आहेत. बाबा गणेश मंडळाजवळ अर्थवशिर्षं घेण्यात आले. यानंतर रोज मोठ्या मंडळाजवळ जाऊन अथर्वशीर्ष म्हटले जाणार आहे. अस्तित्व ग्रुपच्या या उपक्रमास महिलांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. अस्तित्व ग्रुपच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.