अस्थाना यांची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याची बदलीप्रकरणी कोर्टात धाव

0

नवी दिल्ली- सध्या सीबीआय (केंद्रीय अन्वेषण विभाग ) संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनला आहे. येथील वर्ग एकच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप केले आहे. त्यानंतर आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. राकेश अस्थाना यांची चौकशी करणाऱ्या सीबीआय अधिकारी ए.के.बस्सी यांची बदली करण्यात आली. या बदलीविरोधात बस्सी यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. मात्र सुप्रीम कोर्टाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.

अस्थाना यांची चौकशी करणाऱ्या सीबीआयमधील १३ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.

सीबीआयमधील संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश ए.के.पटनाईक यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. दोन आठवड्यात या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे.