‘अस्मिता’ अंतर्गत विद्यार्थिनींना वेडिंग मशीनचे मार्गदर्शन

0

पिंपळनेर । महाराष्ट्र राज्य सरकारच्या ‘महिला आणि बालविकास विभागाच्या महत्वाकांक्षी ’अस्मिता’ योजनेअंतर्गत सॅनेटरी नॅपकीन वेंडींग मशिन पिंपळनेर ता. साक्री येथे मैंदाणे आश्रमशाळेतील विद्यार्थिनी आणि शिक्षिका ज्योती पाटील यांनी भेट देऊन त्याची माहिती व उपयोगिता समजून घेतली. शाळेतील 11 ते19 या वयोगटातील किशोरवयीन मुलींना स्वस्त दरात सॅनेटरी नॅपकिनचे पाकिट उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच त्यांचे आरोग्य व स्वच्छता याविषयी जनजागृती करण्यासाठी अस्मिता योजना लागू करण्यात आली आहे. त्यानुसार पिंपळनेर शहरात प्रथमच ओम शांती बचत गटाकडून देश बंधू मंजू गुप्ता फाऊंडेशन यांच्या सहकार्याने सॅनेटरी नॅपकिन वेंडिंग मशिन बसविण्यात आले आहे.

मशिन हाताळणीची माहिती
या मशिनची कार्यपद्धती व इतर माहिती रेखा साळवे यांनी विदयार्थिनींना समजावून दिली. विदयार्थिनींनी स्वतः मशिन हाताळले. तसेच या योजनेअंतर्गत लाभधारकांना ‘अस्मिता कार्ड ’ मिळवण्यासाठी प्रस्ताव शासनास सादर करणार असल्याचे शिक्षिका ज्योती रामराव पाटील यांनी सांगितले. समाजतून सर्वच लाभार्थ्यांनी पुढे येऊन योजना तळागाळापर्यंत पोहचवावी व योजनेचा लाभ घेऊन आरोग्यदायी सशक्त भारत निर्मितीसाठी पुढे यावे असे आवाहन ज्योती पाटील यांनी केले आहे. यासाठी मुख्याध्यापक कोकणी सर, चौरे सर, भामरे सर , के. एन. सर, श्रीमती अहिरराव, गावित, कारंडा, ठाकरे मॅडम यांचे सहकार्य लाभले.