अस्वच्छता असतांना बील अदा

0

धुळे । शहरातील प्रभाग क्र.35 मध्ये सर्वत्र घाण पसरलेली असून बचत गटाच्या माध्यमातून ठेकेदार बोगस बिले काढून मनपाची आर्थिक लूट करीत असल्याची तक्रार नगरसेवक फिरोजलाला यांनी काल केली. या तक्रारीची तात्काळ दखल घेत सहा.आयुक्त शांताराम गोसावी यांनी प्रभाग क्र.35मध्ये प्रत्यक्ष पहाणी केली. यावेळी तक्रारीतील तथ्य निदर्शनास आल्याने त्यांनी संबंधीतांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. प्रभाग क्र.35 मध्ये स्वच्छतेची कामे होत नसून ट्रॅक्टर,घंटागाड्या येत नसल्याने सर्वत्र घाण आढळत आहे.याबाबत तक्रारक करुनही कारवाई होत नाही उलट बचत गटाच्या माध्यमातून स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराकडून बोगस बिले काढून मनपाची आर्थिक लुट होत असल्याची तक्रार नगरसेवक फिरोजलाला यांनी केली होती.

स्वच्छता न केल्यास जनआंदोलनाचा इशारा
प्रभाग 35 मध्ये ठेकेदारामार्फेत स्वच्छता करण्यात येत नसल्याची तक्रार नगरसेवक फिरोजलाल यांनी केली होती. प्रभागात स्वच्छता नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचेही फिरोजलाल यांनी तक्रारीत म्हटले होते. ठेकेदारांना स्वच्छता न करताच महानगरपालिकेकडून बीले अदा करण्यात येत असल्याची तक्रार केली होती. प्रभाग 35 मधील अस्वच्छतेबाबत वारंवार तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने नगरसेवक फिरोजलाल यांनी थेट साहाय्यक आयुक्त गोसावी यांच्याकडे तक्रार केली होती. प्रभागातील अस्वच्छतेने साथीचे रोग पसरण्याची भिती देखील फिरोजलाल यांनी व्यक्त केली होती. नगरसेवक फिरोजलाल यांनी तक्रारीची दखल घेवून स्वच्छता न केल्यास गरज पडल्यास जनआंदोलन छेडून प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला होता. यामुळे सहा.आयुक्तांनी तात्काळ पहाणी करुन संबंधीतांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. या पहाणी दौर्‍याप्रसंगी नगसेवक फिरोजलाल यांच्यासह परिसरातील नागरीक उपस्थित होते. यावेळी अनेक नागरिकांनी प्रभागातील अस्वच्छतेच्या बाबत असमाधान व्यक्त केले. या नागरिकांनी प्रभागातील अस्वच्छतेबाबत तोंडी तक्रारी देखील सहा.आयुक्तांकडे केल्या. त्यामुळे प्रभागात तत्काळ स्वच्छतेचे आदेशही संबंधीतांना देण्यात आले.

पदाधिकारी बिले काढण्यात मग्न
नगरसेवक फिरोजलाल यांच्या तक्रारीनुसार सहाय्यक आयुक्त शांताराम गोसावी यांनी आज केलेल्या पहाणीत प्रभाग क्र. 35 मध्ये ठिकठिकाणी कचरा आढळून आला. या पहाणीत गोसावी यांना गटारी व नाल्यांची स्वच्छता करतांना काढलेली घाण गटारी व नाल्यांजवळ तशीच पडून असल्याचे गोसावी यांना आढळून आले. प्रत्यक्ष पहाणीत अस्वच्छता दिसल्याने या भागात टॅक्ट्रर, घंटागाड्या येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रभागातील सफाईचा ठेका शाम महिला बचत गटास देण्यात आला आहे. मात्र, या बचतगटाकडून साफसफाई न होता या बचत गटाचे पदाधिकारी केवळ बीले काढण्यामागे मग्न असल्याचा आरोप फिरोजलाला यांनी केला आहे.