अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर

0

सावखेडासीम शिवारातील प्रकार ; आठवडाभरातील तिसर्‍या घटनेने घबराट

यावल : तालुक्यातील सावखेडासीम शिवारात एका 55 वर्षीय शेतकर्‍यावर अस्वलाने हल्ला केल्याने शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. नागो भावराव पाटील असे शेतकर्‍याचे नाव असून ते नायगाव येथील रहिवासी आहेत.

तालुक्यात अस्वलाने हल्ला केल्याची ही आठवडाभरातील तिसरी घटना आहे त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास नागो भावराव पाटील (55, रा.नायगाव) हे आपल्या सावखेडासीम शिवारातील शेतात पिकास पाणी भरण्यास गेले होते. दरम्यान रात्री 10 वाजेच्या सुमारास त्यांच्यावर अस्वलाने हल्ला केला त्यात त्यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली तसेच अस्वलाने त्यांच्या डाव्या कानाचे लचकेच तोडले आहे. जखमी अवस्थेत त्यांना किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले त्यानंतर प्रथमोपचार करून जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.