अहमदनगर : राष्ट्रवादी कॉंग्रेस कोणत्याही परिस्थितीत अहमदनगर लोकसभेची जागा सोडणार नाही असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. कॉंग्रेसचे नेते जनसंघर्ष यात्रा जिथे जाते, तिथे ते हेच सांगत असतात. त्याचप्रमाणे अजित पवार यांनी नगरमध्येही हेच सांगितले.
अहमनगर लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे आहे. त्यांनी काय बोलयचे तो त्यांचा प्रश्न आहे. सद्यस्थितीत त्यांची राज्यभर जनसंघर्ष यात्रा सुरु आहे. या दरम्यान सुमारे ३५ ते ४० ठिकाणी त्यांनी ही जागा आपल्याकडे घेऊ, असे सांगितले आहे. अंतिम निर्णय १२ तारखेला होईल. अजित पवार कधीही खोटे बोलत नाही. हे महाराष्ट्राला माहित आहे, जे मी सांगतो आहे, तेच होईल आणि तुम्हाला ते दिसेल, असेही पवार म्हणाले. अशोक चव्हाण हे विखेंना खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही पवार म्हणाले.