अहमदनगर-पुणे महामार्गावर एका खासगी बसचा भीषण अपघात झाल्याने आठ जण जागीच ठार झाले आहे. औरंगाबादहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या एका ट्रकला जोरदार धडक दिली. बस चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण फाटा येथे आज सोमवारी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात चालकाच्या केबिनसह बसच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे.