अहमदनगर व पुणे ग्रामीणची विजयी सलामी

0

डेव्हिड चषक क्रिकेट सामने सुरू

लोणावळा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व निवृत्ती बाबाजी नवले महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या मुलांच्या आंतर विभागीय क्रिकेट स्पर्धेत पुणे ग्रामीण संघाने पुणे शहर संघावर व नगर संघाने नाशिक संघावर मात करत विजयी सलामी दिली. कुसगाव लोणावळा येथील सिंहगड कॅम्पसमध्ये आज या स्पर्धेचे संकुल संचालक डॉ. माणिक गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी सिंहगड संकुलातील महाविद्यालयांचे सर्व प्राचार्य उपस्थितीत होते.

लीग स्पर्धेची सुरूवात

क्रिकेट स्पर्धेची सुरुवात पुणे शहर, पुणे ग्रामीण, नाशिक व अहमदनगर या चार विभागाच्या संघांमध्ये लिगपद्धतीने झाली. आजचा पहिला सामना पुणे शहर विरुद्ध पुणे ग्रामीण असा पार पडला. यामध्ये पुणे शहर संघाने 133 धावांचे लक्ष ग्रामीण संघासमोर ठेवले होते. ग्रामीण संघाने अवघ्या 26 षटकांमध्ये 135 धावां करत विजयावर मोहोर उमठवली. दुसरीकडे नाशिक विभाग विरुद्ध अहमदनगर विभागामध्ये प्रथम फलंदाजी करताना अहमदनगर संघाने 161 धावांचे लक्ष नाशिक संघासमोर ठेवले होते. हे लक्ष गाठताना नाशिक संघ 115 धावांवर बाद झाल्याने अहमदनगर संघाने लिगमधील विजयी सलामी दिली. आजच्या खेळामध्ये अहमदनगरच्या ऋषी बापटे याने 46 चेंडूमध्ये 34 धावा काढून प्लेअर ऑफ द मॅच ठरला. तर पुणे ग्रामीण मधील सैफ खानने 30 चेंडूमध्ये चार विकेट घेऊन प्लेअर ऑफ द मॅच ठरला. उद्याचे सामने अहमदनगर विरुद्ध पुणे शहर व पुणे ग्रामीण विरुद्ध नाशिक असे होणार आहेत.