मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : अहमदनगर महानगरपालिकेच्या पोट निवडणुकीच्या प्रचारादरम्यान संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या झालेल्या हत्येप्रकरणी कायदा व नियमानुसारच कार्यवाही केली जाईल, यात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.
हे देखील वाचा
सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, झालेला प्रकार हा निंदनीय असून पोलीसांची कार्यवाही सुरु आहे. ज्यांच्या विरुद्ध पुरावे असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. पोलीस अधिकारी यांचा थेट सहभाग असेल तर त्यांच्यावर ही कारवाई केली जाईल. भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून अहमदनगर शहरात सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत प्रस्तावित आहे. तसेच गुन्हा क्र. १३६/२०१८ मध्ये उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्तीबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे. या चर्चेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सदस्य अनिल परब यांनी सहभाग घेतला.