अहमदाबादच्या इसमाचा वरणगावात ढाब्यावर मृत्यू

0

भुसावळ : अहमदाबाद येथून मूळ रहिवासी असलेल्या मात्र वरणगाव भागात ट्रक चालकांना गाईड म्हणून मार्गदर्शन करणार्‍या 30 वर्षीय इसमाचा वरणगाव रस्त्यावर हॉटेल फौजीजवळ शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला. हृदयविकाराने हा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. वरणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ओळख पटवण्याचा प्रयत्न केल्यानंतर मयताचे नाव कालिया असल्याचे समजते. वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्तयूची नोंद करण्याचे काम सुरू होते.