भुसावळ- गाडी क्रमांक 15560 व 15559 दरभंगा-अहमदाबाद एक्स्प्रेसला प्रायोगिक तत्वावर बर्हाणपूर रेल्वे स्थानकावर सहा महिन्यांसाठी थांबा देण्यात आला आहे. डाऊन गाडी 15560 ही गाडी बर्हाणपूर स्थानकावरून दर शनिवारी सकाळी 7.41 वाजता सुटेल तर अप 15559 अप गाडभ अहमदाबाद जाण्यासाठी बर्हाणपूर स्थानकावरून दर गुरूवारी रात्री 9.38 वाजता सुटेल. रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.