पिंपरी-चिंचवड : जैन सोशल डायमंड ग्रुपच्या वतीने भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणानिमित्त चिंचवड येथील राजेश ताथेड परिवाराने चिंचवड ते नाशिक हा सायकल प्रवास केला. या प्रवासात त्यांनी जैन धर्माचा प्रचार केला. या अहिंसा सायकल रॅलीत राजेश ताथेड, त्यांच्या पत्नी राजश्री ताथेड तसेच रचना, रितू, रैना या तिन्ही मुलींनी सहभाग नोंदवला. या परिवाराने 8 एप्रिलला सकाळी पाच वाजता चिंचवड येथून रॅलीला सुरुवात केली. सुमारे 350 किलोमीटर अंतर सायकलने पार करत 12 गावात जैन धर्माचा प्रचार केला. प्रत्येक गावात गेल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले. कुणाल भळगट, धर्मेश सेठ यांनी अनुक्रमे चाकण, मंचर, पेठ, नाशिकपर्यंत ताथेड परिवाराला साथ दिली. जैन सोशल डायमंड ग्रुपच्या वतीने ताथेड परिवाराचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.