अहिरवाडीच्या इसमाचा हृदयविकाराने मृत्यू

0

रावेर– तालुक्यातील अहिरवाडी येथील 50 वर्षीय इसमाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. शनिवारी सकाळी सात वाजता ही घटना उघडकीस आली. तुराब रमजान तडवी (50, रा.अहिरवाडी) असे मयत इसमाचे नाव आहे. तडवी हे रात्री शुक्रवारी रात्री शेतात गेले होते मात्र सकाळी घरी न परतल्याने त्यांचा शोध घेतला असता त्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.