रावेर : शेतात बकर्या चारण्याच्या कारणान दोन गटात दंगल होवून तुफान हाणामारी झाल्याची घटना तालुक्यातील अहिरवाडीत घडली. या प्रकरणी दोन्ही गटाच्या एकूण 34 जणांविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्या आला. गावात पोलिसांनी बंदोबस्त राखला असून तणावपूर्व शांतता आहे तर दुसरीकडे आरोपींची धरपकड सुरू करण्यात आली आहे.
अहिरवाडी दंगली प्रकरणी 22 अटकेत
अहिरवाडी येथे दोन गटात गुरुवारी रात्री बकर्या चारण्यावरून वाद उफाळला. हिंसक जमावाने दोन रीक्षांसह दुचाकी जाळली. एका शेतकर्याच्या हरभर्याच्या शेतात दुसर्याने बकर्या चारण्यास नेल्या असता शेतकर्याने त्यास विरोध केल्याने हा वाद चिघळल्याचे सांगण्यात आली तर जमावाने दगडफेकही केली. गावांतील ट्रान्सफॉर्मर जळाल्याने गावात आधीच वीजपुरवठा खंडित झाला होता त्याचा फायदा दंगलखोरांनी घेतल्याचे वृत आहे. दंगलीनंतर रावेरचे निरीक्षक नरेंद्र पिंगळे, पोलीस उपनिरीक्षक दीपक ढोमणे, नेताजी वंजारी यांनी पोलिस पथकासह स्थिती नियंत्रणात आणली. अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंग आणि विभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र रायसिंग यांनी धाव घेतली. रात्री उशिरा पोलीस कर्मचारी संदीप खंडारे यांच्या फिर्यादीवरून एका गटाच्या 16 तर दुसर्या गटाच्या 18 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला तर दोन्ही गटातील 22 आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक पिंगळे यांनी दैनिक जनशक्तीशी बोलताना सांगितले.