अहिरवाड्याच्या मोबाईल चोरट्यांना कोठडी

0

रावेर- तालुक्यातील अहिरवाडी येथील तीन मोबाईल चोरट्यांना रावेर पोलिसांनी अटक केली होती. आरोपींनी चार मोबाईल चोरीची कबुली दिली असून आरोपींची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. 29 रोजी अहिरवाडी येथून प्रदीप तायडे (22), संदीप उर्फ बिल्ला गोपाळ गोमाटे (22), गंभीर कोचूरे यांना अटक करण्यात आली होती. आरोपींनी पराग वाडोदकर, जयश्री खानचंदानी तसेच विजय पाटील यांच्याकडील मोबाईल चोरीची कबुली दिली आहे. तीनही स्वतंत्र गुन्हे दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली तसेच तीन मोबाईल जप्त करण्यात आले. अधिक तपास पोलिस निरीक्षक आर.बी.वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी पाळदे, पोलीस उपनिरीक्षक अमृत पाटील, पोलिस कॉन्स्टेबल विकास पहुरकर, भरत सोपे, जाकीर पिंजारी, सुरेश मेढे, नरेंद्र बाविस्कर करीत आहेत.