भुसावळ प्रतिनिधी दि 8
शहरातील अहिल्यादेवी कन्या शाळेचे उपशिक्षक (बी एल.ओ) क्रं. १३६ चे मतदान केंद्र स्तरीय अधिकारी अजय डोळे यांनी मा. भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी सोपविलेल्या सर्व कामांकडे हेतू पुरस्सर दुर्लक्ष केले म्हणून डोळे यांच्या विरुध्द पोलीस स्टेशनला फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यादेवी कन्या शाळा, भुसावळ येथील उपशिक्षक अजय चिंधु डोळे यांनी भुसावळ शहरातील यादी भाग क्रमांक १३६ मध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ) या पदावर नेमणूक केलेली आहे. या पदावर काम करत असतांना मा. भारत निवडणूक आयोगाने सोपविलेले विहित कामे विहित मुदतीत पूर्ण करणे आवश्यक असते (ता. २८) ऑगेस्ट रोजीच्या आढावा बैठकीत तत्कालीक उपविभागीय अधिकारी, भुसावळ यांनी सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना मतदाराच्या घरोघरी जावून मतदान कार्ड सोबत आधार कार्ड संलग्न करण्याचे आदेश दिले होते. मात्र श्री डोळे यांनी सदर कामाकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्या यादी भागामध्ये केवळ ५ टक्के एवढचा मतदारांची आधार जोडणीचे काम झाले आहे. त्यानंतर डोळे यांना त्याच्या यादी भागातील १८५ मतदारांचे स्पष्ट फोटो गोळा करणे व ८० पेक्षा जास्त वय असणाऱ्या ४४ मतदारांची पडताळणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र श्री डोळे यांनी या कामाकडे देखील दुर्लक्ष करुन यातील कुठलेही काम पूर्ण केली नाही. त्यानंतर मा. भारत निवडणूक आयोगाच्या आदेशाने श्री डोळे यांना (ता. २१ जुलै ते २१ ऑगेस्ट ) या कालावधी मध्ये मतदारांच्या घरोघरी भेटी देऊन मतदार पडताळणी करण्याचे सुचना दिल्या होत्या. मात्र आज (ता. ७) सप्टेंबर रोजीच्या अहवालानुसार त्यांचे मतदार पडताळणीचे करण्याचे काम केवळ ३१.५८ टक्के एवढेच असुन त्यातुलनेत भुसावळ तालुक्याचे काम ९९.७७ टक्के झाले आहे. मा. भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी सोपविलेल्या सर्व कामांकडे श्री डोळे यांनी हेतू पुरस्सर दुर्लक्ष केले असुन त्यांना (ता.२८) एप्रिल (ता. १३) जुलै, (ता. २७) जुलै व (ता. २३) ऑगस्ट रोजी वेळोवेळी लोक प्रतिनिधित्व अधिनियम १९५० चे कलम ३२ व भारतीय दंडसहिता १८६० चे कलम १८३ अन्वये कारणेदाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र तरी देखील त्यांच्या कामात प्रगती दिसुन येत नाही. तसेच मा. उपविभागीय अधिकारी, भुसावळ यांनी वेळोवेळी बोलविलेल्या आढावा बैठकीसाठी देखील उपस्थित राहात नाही.
सबब उपविभागीय अधिकारी भुसावळ जितेंद्र पाटील तथा मतदा
नोंदणी अधिकारी अंगद असटकर यांनी वेळोवेळी मतदार नोंदणी,
मतदार यादी शुध्दीकरण इ. बाबत दिलेल्या सुचनांचे उपशिक्षक, अहिल्यादेवी कन्या शाळा, भुसावळ अजय डोळे यांनी पालन केलेले नसुन मा. भारत निवडणूक आयोगाने सोपविलेल्या कामाबाबत गंभीर दिसुन येत नाही. तसेच E.R.O. यांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन न केल्याचे माझे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे लोक प्रतिनिधित्व अधिनियम १९५० चे कलम ३२ व भारतीय दंडसंहिता चे कलम १८८ नुसार कारवाई पात्र होतात म्हणून शहर पोलीस स्टेशनला अंगद भागवत असटकर (वय ३५) वर्ष, निवडणूक नायब तहसिलदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अजय चिंधु डोळे (बी.एल.ओ) यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई मुळे तालुक्यात तसेच बी.एल.ओ. मध्ये खळबळ उडाली आहे.