अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त मोटार रॅली

0

जळगाव । पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती निम्मिताने शहरात महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघाच्या वतीने महिला मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज कोर्ट चौकातून रॅलीला सुरुवात करण्यात आली. यावेळी पिवळे झेंडे तसेच फेटाधारी महिला सहभागी झाल्या होत्या कातांई सभागृहात रॅली रुपांतर आयोजित कार्यक्रमात झाले. यावेळी डॉ अलका गोडे,महादेव धनगर,सुभाष सोनवणे,आत्माराम म्हाळके,उज्वला म्हाळके,संगीता चिंचोरे,अमित देशमुख,सरलाबाई शिरसाठ,संतोष धनगर,गणेश बागुल,हिलाल सोनवणे यांच्या सह शेकडोच्या संख्येने समाज बांधव रॅलीत सहभागी झाले होते.