अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

0

चोपडा । वर्डी गावातील तरूण युवकांतर्फे राजमाता अहिल्याबाई होळकर यांची 292 वी जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. या जयंती उत्सवाच्या प्रसंगी दत्तात्रय पाटील व शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांच्याहस्ते दीपप्रजवलन व लहूश धनगर यांनी प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी गावातील सर्व समाजबांधव उपस्थित होते. याप्रसंगी तुषार पाटील यांनी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या बद्दल बोलताना सांगितले की, महेश्वर येथील अहिल्यादेवींची राजधानी ही जणू काव्य, संगीत, कला व उद्योग यांची संगमच होता. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तुषार पाटील मित्र परिवार (वर्डीकर), सतिष नायदे, महेंद्र पाटील, अमोल पाटील, विशाल नायदे, देवेंद्र सुलताने, गणेश सुलताने, संदीप नायदे, विशाल निळे, रोहित पाटील, दीपक पाटील, रविंद्र नायदे, गौरव सुलताने, मनोहर पाटील इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी प्रास्ताविक योगेश पाटील यांनी केले तर आभार मुन्ना नायदे यांनी मानले.

पाचोरा मराठा सेवा संघांतर्फे माल्यार्पण
पाचोरा । पाचोरा येथे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद तर्फे रणरागिणी राजमाता अहिल्यामाई होळकर यांची जयंती अहिल्यामाई होळकर चौक, जळगाव चौफुली, पाचोरा येथे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील, शहराध्यक्ष एस.ए. पाटील, एस.के. अण्णा पाटील, विकास पाटील, संजय पाटील, तसेच कृष्णापुरी विकासो चे संचालक हटकर, संभाजी ब्रिगेडचे राजेंद्र पाटील, सुरेश शिंदे, जीभाऊ पाटील, अनिल मराठे, रवींद्र पाटील, प्रदीप वाघ, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदचे विभागीय अध्यक्ष तेजस पाटील, मनोज पाटील, उज्वल भोई, अमोल म्हस्के, किरण पाटील, अरविंद पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन एस.ए.पाटील तर आभार दीपक पाटील यांनी मानले.