शिंदखेडा । तालुक्यातील अहिल्यापूर येथील रुग्णास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाखांची मदत मंजूर झाली असून डॉ. जितेंद्र ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. अहिल्यापूर येथील लक्ष्मण शंभु शिरसाठ यांना ही मदत मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी शिरपूर शहराजवळ चोपडा फाट्याजवळ अपघात झाला होता. या अपघातात लक्ष्मण शिरसाठ यांना मार लागला होता.
धनादेश सुपूर्द
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला डॉ. जितेंद्र ठाकुर यांनी अहिल्यापूर येथे जावून शिरसाठ कूटूंबीयांची भेट घेऊन मदतीचा एक लाख रुपयांचा धनादेश व पत्र शिरसाठ यांच्या आई सावित्रीबाई, पत्नी सरलाबाई, भाऊ गोरख शिरसाठ यांच्यासह दोन्ही मुली आणि मुलगा यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी गावाचे सरपंच प्रशांत राजपूत, प्रल्हाद राजपूत, संजय पाटील, चंद्रकांत राजपूत, मयुर राजपूत, विजय सुर्यवंशी, सुरेंद्र राजपूत, युवराज राजपूत, मिलींद पाटील, चंद्रकांत तवर, विनोद कापूरे, चंद्रकांत राजपूत उपस्थित होते.
डॉ. ठाकुर यांचा पाठपुरावा
डॉ.जितेंद्र ठाकूर यांनी तात्काळ शिरसाठ यांना त्यांच्या धुळे येथील श्री सिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले होते. पैशाअभावी तालुक्यातील एकही रूग्ण उपचाराशिवाय राहणार नाही. असे सांगुन मदतीचा हात देत धीर दिला. त्यानंतर श्री. शिरसाठ यांना उपचारासाठी तात्काळ मदत मिळावी म्हणून मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून मदतीसाठी तात्काळ हालचाल करण्याची विनंती केली.