1जानेवारी नववर्षाची सुरुवात सर्वांना खूप खूप शुभेच्छा देत असता एकच, तीही खूप महत्त्वाची गोष्ट सांगायचीच ती म्हणजे- सार्यांहून थोर माणूस आहे बार ऊपर माणूस आछे! तहार ऊपर नाई केऊ बंगाली गीतेतील वरील माणूस हेच सांगतात की, सार्यांहून थोर माणूस आहे! त्याहून थोर कुणीच नाही, पण परवाचीच मुंबईतील आगीची (भयानक) घटना बघता वा त्याअगोदरची रेल्वे ब्रीजवरील दुर्घटना बघता इथे माणूस खरंच थोर आहे का? व त्यांची कदर खरंच केली जातेय का? हा खरा प्रश्न आहे. एक साधसं उदाहरण घेऊ या. आईबरोबर सहा-सात वर्षांचा मुलगा आपल्या आजोळी जातो. गेल्याबरोबर त्यांची आजी त्यांच्या आईला विचारते, एकटी आली, जावईबापू नाही आले? तेव्हा नातू आजीला म्हणाला, आई कुठे एकटी आलीये, मी बरोबर आलोय ना! तर घरातील लहानांना जोपर्यंत आपण उपव्यक्ती (सबपर्सन) मानत त्यांना माणसांचा (मेनपर्सन) दर्जा देत नाही. त्याचप्रमाणे त्यांच्याशी वागत नाहीत तोपर्यंत ते लहान लेकरुही इतरांशी माणूस म्हणून वागणार नाही. असं म्हणतात की, एखाद्या व्यक्तीची पात्रता ठरवायची ती तिच्या अंगी कोणते महत्त्वाचे गुण आहेत. याबाबत नव्हे, तर त्या गुणांचा ती उपयोग कसा करते यावरून आज अंगी असलेल्या विविध गुणांची ती व्यक्ती समाजासाठी छानसा उपयोग करून घेते तिची किंमत शून्य ठरते आणि जो (प्रचंड) गाजावाजा करत समाजसेवा (?) करता तो थोर ठरतो, अहो, महापुरुषांच्या जीवनचरित्रांचे अध्ययन केल्यास आपल्याला हेच आढळते की यश प्राप्त करण्यासाठी त्यांना जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागले होते.
एक छोटीशी गोष्ट माणूसपणाची डोंगरातील पायवाटेवर नं एक व्यक्तीही छोटेंसं गाठोडं घेऊन तर एक सत्तरीतली आजी, पाय मोडलेल्या चिमुकल्या नातीला वैद्यकीय उपचारासाठी पाठीवर बसवून निघाली होती. तिला बघितल्यावर व्यापारी म्हणाला, अहो आजी, एवढं ओझं घेऊन या वयात न दमता तुम्ही उतरणीचा रस्ता कसा उतरताय? मी तर एवढ्याशा ओझ्यानं हैराण झालोय त्यावर आजीबाई हसत म्हणाल्या, बाबा रे, ओझं तू वाहत आहेस, ही तर माझी आवडती नात, तिचं मला कसलं रे ओझं? तर ही आहे. सार्याहून थोर माणूस आहे सांगणारी कथा.
रस्त्यावरून चालताना आपण दुकानावरच्या पाट्या वाचतो पण भेटलेला माणूस मात्र वाचत नाही. त्याचं सुख-दु:ख ऐकत नाही. मला हे पुरतं माहितीये की, आज माणसं एकमेकांना भेटली की स्वत:ची दु:ख फार चर्चेत आणत, तुझं बरंच रे, छान आहे रे! म्हणत सतत रडगाणे गात असतात. संवाद न साधता, फक्त बरंय, ठीक आहे, ओके, बाय वगैरे म्हणत तुटल्यासारखे वागत असतात, पण आपणही तसंच वागावं हे कितपत योग्य? घरातील लेकरं प्रचंड उत्साहाने जेव्हा त्यांच्या छोट्याशा भावविश्वातील (साध्याशा) गंमती आईबाबांना सांगायला येतात तेव्हा मला वेळ नही, नंतर सांग वगैरे उत्तरं देतात ते कितपत बरोबर आहे? चित्रकलेच्या शिक्षकांनी मुलांना जेव्हा आईचे चित्र रंगवायला सांगितले. तेव्हा एका मुलीने स्मार्ट आईचे चित्र काढले पण तिचे दोन्ही कानच दाखवले नाही. सरांनी विचारले तेव्हा ती सहजपणे म्हणाली, जी आई माझं काहीच ऐकून घेत नाही तिला कशाला कान हवेत?शेवटी अजून एक छोटासा प्रसंग वा किस्सा सानेगुरुजी विनोबा भावेंकडे येते म्हणाले, दु:ख अपप्रवृत्ती, दुराचार, भ्रष्टाचार बघून मी खूप दु:खी झालोय. जगाचा मला कंटाळा आलाय! तेव्हा विनोबा त्यांना म्हणाले, गुरुजी, तुमच्या आसपास अनेक दीनदु:खी फिरत आहेत,त्यांच्यात ईश्वराचे दर्शन घ्या. त्यांची मनोभावे सेवा करा. त्यांची सुख-दु:ख समजून घ्या. त्यांना धीर द्या, जगण्याचं बळ द्या. पुन्हा एकदा सर्वांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!
– चंद्रकांत भंडारी,जळगाव
9890476538