अॅडव्होकेटस् अॅक्टमधील तरतुदीविरोधात वकिलांचे आंदोलन

0

कल्याण : केंद्र सरकारने वकिलांसंदर्भात प्रस्तावित केलेल्या अॅडव्होकेटस् अॅक्टमधील तरतुदीविरोधात कल्याण न्यायालयातील वकिलांनी अर्धा दिवस काम बंद आंदोलन केले. तसेच या कायद्याच्या प्रतिकात्मक प्रतदेखील यावेळी जाळून आपला रोष व्यक्त केला.

केंद्र सरकार आणू पाहणाऱ्या या नविन कायद्यात अनेक अशा तरतूदी आहेत ज्या वकीलांसाठी फारच जाचक असल्याचे सांगत त्याविरोधात आम्ही हे आंदोलन केल्याची माहिती कल्याण न्यायालयातील वकीलांनी दिली. त्यामूळे केंद्राने हा कायदा लागू न करण्याची मागणी करून आपल्या मागण्यांचे एक निवेदन तहसिलदारांना यावेळी देण्यात आले.

या आंदोलनात कल्याण वकील (दिवाणी) संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ कर्णिक, उपाध्यक्ष सुदेश गायकवाड, सचिव सतीश अत्रे, सहसचिव सदाशिव पटवर्धन, खजिनदार नरेंद्र बोन्द्रे, सह खजिनदार सन्नी जैन, सदस्य वैशाली कापुरे, अजित शिंदे, विकास भुंडेरे, संतोष भालेराव, प्रमोद पाटील यांच्यासह अॅड. सावंत, गोळे, जैन, झुंझारराव, मोडक, साठे, खुळे, पाटील आदी सदस्यही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. दरम्यान उद्या यासंदर्भात ठाणे जिल्हा न्यायकायातून मुंबईतील आझाद मैदान येथे निदर्शने केली जाणार आहेत.