मुंबई । जेट एअरवेजने युरोपला जाणार्या प्रवाशांसाठी अॅतमस्टरडॅम व पॅरिससाठीच्या विमानसेवेसाठी सोमवारी विशेष भाड्याची घोषणा केली. 15 सप्टेंबर रोजीच्या प्रवासासाठी लागू असलेल्या या विशेष ऑफरनुसार, प्रवाशांना जेट एअरवेजच्या संपूर्ण देशांतर्गत जाळ्यातील सर्व ठिकाणांहून अॅबमस्टरडॅम व पॅरिसला जाण्यासाठी आता सर्वसमावेशक, वन-स्टॉप ‘फ्लॅट’ रिटर्न प्रवासाचे विशेष भाडे इकॉनॉमीसाठी 39,990 रुपये व प्रीमिअर प्रवासासाठी 99,990 रुपये भाडे आकारले जाणार आहे.
उदयोन्मुख शहरांना युरोपशी जोडणारी ऑफर
ही मर्यादित कालावधीसाठीची ऑफर कंपनीच्या 29 ऑक्टोबर 2017 पासून चेन्नई – पॅरिस (9डब्लु 128), बेंगळुरू – अॅरमस्टरडॅम (9डब्लु 236) आणि मुंबई-लंडन हिथ्रो (9डब्लु 116) या दरम्यान सुरू होणार असलेल्या नव्या व आगामी नॉन-स्टॉप सेवांसाठी लागू असणार आहे. कंपनीच्या देशांतर्गत जाळ्यातून कुठूनही सुरू होणार्या विमानसेवेसाठी एकच भाडे आकारले जाणार असल्याने भारतातील उदयोन्मुख शहरांना युरोपशी जोडण्यासाठी मदत होणार आहे. विशेष भाडे असलेल्या तिकिटांची विक्री तातडीने सुरू होणार असून ती 10 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.
परतीच्या प्रवासाची सोय करून देणारी एकमेव कंपनी
देशभरातील सर्व प्रवाशांना विमानसेवा सुरू होण्याचे ठिकाण कोणतेही असले तरी निश्चित स्वरूपाचे भाडे भरून आता कंपनीच्या देशांतर्गत जाळ्यातील कोणत्याही ठिकाणावरून मुंबई, दिल्ली, बेंगळुरू व चेन्नईमार्गे अॅणमस्टरडॅम/पॅरिसला जाता येणार आहे. म्हणजेच, अमृतसर ते अॅनमस्टरडॅम हा प्रवास पुणे ते पॅरिस यासारखाच असणार आहे.
दक्षिण भारतातून दिल्या जाणार्या दोन नव्या थेट, नॉन-स्टॉप विमानसेवांचा समावेश या ऑफरमध्ये केल्याने एकाच आयटिनरीमार्फत प्रवाशांना युरोपला जाण्यासाठी व सोयीचे पर्याय देणारी व तेथून पुढे आपल्या युरोपातील सेवेद्वारे उत्तर अमेरिकेला सेवा देणारी आणि व अन्य सेवेमार्फत परतीचा प्रवास करण्याची सोय देणारी ही एकमेव विमानकंपनी ठरणार आहे.
-153 परीक्षांचे निकालांपैकी आर्ट्सच्या 78, कॉमर्सच्या 7, सायन्सच्या 10, व्यवस्थापनाच्या 10, तंत्रज्ञान 48 विषयांचा यामध्ये समावेश आहे.
-मुदत संपल्यानंतर आता विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम.ए. खान यांनी सर्व निकाल 5 ऑगस्टपर्यंत लागतील, असे सांगत आहेत, मात्र सर्व निकालांसाठी 10 ऑगस्ट उजाडेल, असे बोलले जात आहे.