ओव्हल-ओव्हलच्या मैदानात सुरु असलेल्या अखेरच्या कसोटीत भारतावर पुन्हा पराभवाची वेळ आली आहे. इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दुसऱ्या डावात भारताचे ३ गडी माघारी परतले आहेत. मात्र आपल्या कारकिर्दीचा अखेरचा कसोटी सामना खेळणाऱ्या अॅलिस्टर कूकने शतकी खेळी करुन अनेक विक्रमांची नोंद केली.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या डावखुऱ्या फलंदाजांच्या यादीत अॅलिस्टर कूक पहिल्या स्थानावर पोहचला आहे. कूकने श्रीलंकेच्या कुमार संगकाराला मागे टाकले आहे.
अॅलिस्टर कूकने १२ हजार ४७२ धावा, कुमार संगकारा – १२ हजार ४०० धावा, ब्रायन लारा – ११ हजार ९५३, शिवनारायण चंद्रपॉल – ११ हजार ८६७ धावा आपली अखेरची कसोटी खेळत असताना तिसऱ्या विकेटसाठी सर्वाधिक धावांची भागीदारी करणाऱ्यांच्या यादीत कूक-रुट जोडी तिसऱ्या स्थानावर राहिली आहे.