जळगाव- डीआरटीच्या आदेशानुसार चार महिण्यापूर्वी दुसर्यांदा मनपाचे सर्व बँक खाते सील केले होते. त्यानंतर काही बँकांनी खाते पूर्ववत केले.मात्र अॅक्सीस बँकेतील खाते आतापर्यंत सील होते.त्यामुळे मनपाची आर्थिक कोंडी झाली.अखेर डीआरडीतून अपिल रद्दबातल झाल्यानंतर सील केलेले बँक खाते पूर्ववत करण्यात आल्याची माहिती आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी दिली.
तत्कालीन जळगाव नपाने हुडकोकडून कर्ज घेतले होते. मनपातर्फे दरमहा तीन कोटींचा हप्ता अदा करण्यात येत होता.दरम्यान,हुडकोने डीआरटीत धाव घेतल्यानंतर मनपाला 341 कोटींची डीक्री नोटीस बजावण्यात आली होती. मनपाने रक्कम अदा न केल्याने 2014 मध्ये तब्बल 50 दिवस मनपाचे बँक खाते सील केले होते.त्यानंतर जून2019 मध्ये पून्हा मनपावर बँक खाते सील केल्याची नामुष्की ओढावली होती.मुबंई उच्चन्यायालयाच्या आदेशान्वये आयसीआयसीआय आणि अलाहबाद बँकेने सील पूर्ववत केले.मात्र अॅक्सीस बँकेने डीआरटीच्या आदेशानेच सील केलेले खाते पूर्ववत करणार अशी ठाम भूमिका घेतली होती.मात्र राज्य शासनाने हुडको कर्ज फेडीचा निर्णय घेवून कर्जाची रक्कम अदा केल्यानंतर मनपा कर्जमुक्त झाली.तसेच डीआरटीतील सर्व अपिल रद्दबातल केल्यामुळे अॅक्सीस बँकेने मनपाचे बँक खाते पूर्ववत केले आहे.