धुळे । संपूर्ण महाराष्ट्रभरात येत्या 23 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत असलेल्या अॅट्रॉसिटी चित्रपटाची संपूर्ण टीम उद्या शहरात येत आहे. अॅट्रॉसिटी कायद्याबाबत समाजात विशेष जागृती व्हावी, या उद्देशाने दीपक कदम दिग्दर्शित या सिनेम्याची डॉ. राजेंद्र पडोळे यांनी आर. पी. प्रॉडक्शनच्या माध्यमातून निर्मिती केली आहे. अॅट्रॉसिटी चित्रपटाचे दिग्दर्शक दीपक कदम, निर्माते राजेंद्र पडोळे यांच्यासमवेत अभिनेत्री पुजा जयस्वाल व अभिनेता सुयश पडोळे उद्या धुळे रेत आहेत अशी माहिती धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मिलिंद बैसाणे यांनी दिली.
नायक-नायिका राहणार उपस्थित
अॅट्रॉसिटी कायद्याची समाजात विेशेष जागृती व्हावी, या हेतूने अॅट्रॉसिटी हा चित्रपट बनविण्यात आला आहे. या चित्रपटाची गीते गीतकार अनंत जाधव, मंदार चोळकर, अखिल जोशी, विजय के. पाटील यांनी लिहिली आहेत. तर संगित अमर-रामलक्ष्मण यांनी दिले असून आनंदी जोशी, वैशाली सामंत, जान्हवी प्रभू -अरोरा,शशीकांत मुंबारे, नंदेश उमप, सौरभ पी. श्रीवास्तव या गायकांनी या गीतरचना गायल्या आहेत.अनिल सुतार आणि जास्मिन ओझा यांनी गाण्यांची कोरिओग्राफी केली आहे. राजेश सुर्वे आणि मंगेश केदार यांनी या चित्रपटाची पटकथा संवाद लिहिले आहेत. यतिन कार्येकर, लेखा राणे, सुरेखा कुडची, निशिगंधा वाड आदी या अनुभवी कलाकारांच्या जोडीला ऋषभ पडोळे आणि पूजा जस्ववाल या नव्या जोडीने भूमिका निभावली आहे.