अ‍ॅडम ग्रिलखिस्टचा विक्रम मोडला हार्दिक पांड्याने

0

लंडन । भारतीय संघा आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीच्या अतिम सामन्यात 180 धावांनी पराभव झाला. भारताचा संपुर्ण डाव हा 158 धावांत गुडाळला गेला. हार्दिक पांड्या सोडल्यास भारताचे स्टार फलंदाज हे काहीच कामगिरी करू शकले नाही. या सामन्यात भारताकडून पाड्याने फक्त एकाकी झुंज देवून आपल्या नावावर जलद अर्धशतक बनविण्याचा विक्रम नोदविला. आज पर्यंत हा विक्रम अडम ग्रिलख्रिस्टच्या नावावर होता.

32 चेंडूत 50 धावा पांडेच्या
चॅम्पियन ट्रॉफीच्या अतिम सामन्यात भारतीय संघ दडपणाखाली खेळत होता. एकामागुन एक स्टार फलंदाज तंबूत परत जात होते. अशा अवस्थेतही भारतकडून हार्दिक पांड्या मात्र धुव्वाधार फलंदाजी करित होता. पांड्याने 76 धावांची खेळी करून एकाकी झुंज दिली. भारत हरला मात्र हार्दिक पांड्याने सर्वांची मने जिंकली. पांड्याने तुफानी फलंदाजी करत 43 चेंडूत 76 धावा ठोकल्या. आयसीसी वनडे स्पर्धेच्या फायनलमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम पांड्याच्या आपल्या नावावर केला. यापुर्वी हा असा विक्रम 1999च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा अडम ग्रिलख्रिस्टने 33 चेडूत अर्धशतक केले होते. तो विक्रम पांड्याने मोडला.पांड्याने केवळ 32 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांच्या सहाय्याने अर्धशतक झळकावले. तर 43 चेंडूत 6 षटकार आणि 4 चौकारांच्या सहाय्याने 76 धावा ठोकल्या.