अ‍ॅड. पटवर्धन यांचा ब्राह्मण महासंघातर्फे सत्कार

0

अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल

पिंपरीः अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी-चिंचवडच्यावतीने अ‍ॅड. सचिन पटवर्धन यांची राज्यस्तरीय लेखा समितीच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे शहराध्यक्ष दिलीप कुलकर्णी, राष्ट्रीय महिला सरचिटणीस संजीवनी पांडे, उपाध्यक्ष सुहास पोफळे, राजन बुडुख, सरचिटणीस महेश बारसावडे, कार्याध्यक्ष पुष्कराज गोवर्धन, अनंत कुलकर्णी, अ‍ॅड. अंतरा देशपांडे, सुषमा वैद्य आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

शांतपणे उत्तर देणे गरजेचे
यावेळी दिलीप कुलकर्णी म्हणाले की, वाद नको संवाद हवा अशा प्रकारची संघटनेची भूमिका असल्याचे स्पष्ट केले. तोच धागा पकडून आपण अभिनंदन करायला आलो आहोत. आपली फार मोठी जबाबदारी असून कोणी कितीही चुकीच्या पध्दतीने आरडाओरड केली तरी त्यास न उगमगता, धैर्याने आणि शांतपणे उत्तर देणे गरजेचे आहे. ही दुष्ट प्रवृत्ती जाती-जातीत तेढ निर्माण करतात. अशाने देशाचे खूप मोठे नुकसान होत आहे. आपण मात्र देशाला प्रथम प्राधान्य देऊन काम करण्याची गरज आहे फुले-शाहू-आंबेडकर-टिळक-सावरकर -आगरकर-चापेकर यांच्या विचारांची आज देशाला गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आभार महेश वारसावडे यांनी मानले.