अ‍ॅड.बाहेती प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

0

जळगाव । अ‍ॅड. बबनभाऊ बाहेती प्रतिष्ठानतर्फे रविवारी 9 रोजी बाहेती महाविद्यालयात शहरातील 11 हजार विद्यार्थ्यांना 66 हजाराचे मोफत वह्या लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार सुरेश जैन, तर प्रमुख पाहुणे म्हणून सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, महापौर नितीन लढ्ढा, आमदार चंद्रकांत सोनवणे, जगन्नाथ वाणी, उपमहापौर ललित कोल्हे, अभय जैन, प्रताप पाटील, स्थायी समितीच्या सभापती वर्षा खडके, साधना कोगटा, संजय बिर्ला, प्रदीप तळवेलकर, विजय वाणी, विनोद बियाणी, बाहेती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आयोजक श्याम कोगटा, शरद बियाणी, सुनील महाजन, नितीन बरडे, रोहन बाहेती, अशोक राठी आदी उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत मनोज चौधरी, कैलास चौधरी, नगरसेवक राजू मोरे, रोहन बाहेती, प्रा. सतीश कोगटा, रमेश माळी, पवन ठाकूर यांनी केले.

दीपप्रज्वलन बबनभाऊ बाहेती यांच्या प्रतिमेचे या वेळी पूजन करण्यात आले. श्याम कोगटा यांनी प्रास्ताविक केले. तसेच सुरेश जैन यांनी लेखन साहित्य वह्या यांचा चांगला उपयोग करून खूप अभ्यास करा आणि जीवनात यशस्वी व्हा, असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. खुबचंद सागरमल विद्यालयातर्फे श्याम कोगटा यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. राजेश जाधव यांनी सूत्रसंचालन, तर आभार प्रा. यू. के. फासे यांनी मानले. कार्यक्रमास प्रकाश पाटील, संजीव बागुल, विनोद विरपन, आनंद महांगडे, गणेश गायकवाड, सम्राट बेलदार, जितेंद्र वाघ, समीर कुलकर्णी, महेंद्र नाईक, अनिल कोळी, नीलेश पाटील, हितेश सोनी, हरीश शेळके सदस्यांचे सहकार्य लाभले. भवरलालअ‍ॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनच्या माध्यमातून जैन उद्योगसमूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यातर्फे या वर्षीदेखील जवळपास 35 हजार वह्या या उपक्रमासाठी देण्यात आल्या.