अ‍ॅड.राजेंद्र महाजन अध्यक्षपदी

0

जळगाव । जळगाव जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीत अ‍ॅड.राजेंद्र रामदास महाजन हे 279 मतांनी विजयी होवून अध्यक्षपदी निवड झाली आहे, तर उपाध्यक्षपदी अ‍ॅड.मिलिंद पंढरीनाथ बडगुजर (326), सचिवपदी अ‍ॅड.अनिल सूर्याजी पाटील (291) व सहसचिवपदी अ‍ॅड.रत्ना गुलाबराव चौधरी (307) विजयी झाले आहे. जळगाव जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीसाठी जिल्हा न्यायालयातील लायब्ररी सभागृहात बुधवारी मतदान झाले. मतदानानंतर लागलीच सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास मतमोजणी होऊन निकाल घोषीत करण्यात आला.

अशी मिळाली मते
जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी अ‍ॅड.राजेंद्र रामदास महाजन, अ‍ॅड.दीपकराज सोपान खडके व जगन्नाथ चिंतामन पाटील रिंगणात होते. अ‍ॅड.खडके यांना 63 व अ‍ॅड. पाटील यांना अवघे 28 मते मिळाली. उपाध्यक्षपदासाठी अ‍ॅड.के.बी.वर्मा यांनी अर्ज दाखल केला होता, मात्र मतदानाच्या आदल्यादिवशी निवडणूक न लढविण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला होता, परंतु तरीही त्यांना 41 मते मिळाली. सचिव पदासाठी अ‍ॅड.अनिल पाटील व अ‍ॅड.संजयसिंह पाटील यांच्यात लढत होती. अ‍ॅड.संजयसिंह पाटील यांना अवघे 78 मते मिळाली. सहसचिव पदासाठी देखील अ‍ॅड.रत्ना चौधरी व अ‍ॅड.श्रध्दा काबरा यांच्यात लढत होती. अ‍ॅड.काबरा यांना अवघे 61 मते मिळाल्याने त्यांचा पराभव झाला.

कोषाध्यक्ष व सदस्य बिनविरोध
अ‍ॅड.महेश ढाके यांची कोषाध्यक्षपदी तर सदस्य पदासाठी अ‍ॅड.रजनीश राणे, अ‍ॅड.मंगेश सरोदे, अ‍ॅड.मंजुळा मुंदडा, अ‍ॅड.श्रीकृष्ण निकम, अ‍ॅड.शेख शरीफ शेख हुसेन, अ‍ॅड.योगेश पाटील, अ‍ॅड.राहूल अकुलकर, अ‍ॅड.नितीन चौधरी, अ‍ॅड.अर्चना करवा-भदादे व अ‍ॅड.प्रवीण शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

एक मतपत्रिका गहाळ
या निवडणुकीत एकुण 537 पैकी 371 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात 10 मते बाद झाली तर एक मतपत्रिका गहाळ झाली. मतदानानंतर लायब्ररी सभागृहात लागलीच मतमोजणी झाली. त्यानंतर साडे सात वाजता निकाल घोषीत करण्यात आला. मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून अ‍ॅड.आर.एन.पाटील, निवडणूक अधिकारी म्हणून अ‍ॅड.व्ही.आर.घोलप, अ‍ॅड.ए.आर.सरोदे, अ‍ॅड.कालिंदी चौधरी यांनी काम पाहिले तर त्यांना सहायक म्हणून अ‍ॅड.अरविंद शुक्ल, अ‍ॅड.बी.पी.साळी, अ‍ॅड.विरेंद्र पाटील, अ‍ॅड.जयंत कुरकुरे, अ‍ॅड.चंद्रशेखर निकुंभ व अ‍ॅड.कल्याण पाटील यांनी काम पाहिले.