मुक्ताईगनर- जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा तथा जळगाव जिल्हा भाजपा सरचिटणीस अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगर येथे रक्तदान शिबिरासह खाऊ वाटप, अन्नदान तसेच फळ वाटपाचा कार्यक्रम झाला. दिवसभर कार्यकर्त्यांसह समर्थकांनी अॅड.खडसे-खेवलकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. अजय जैन मित्र परीवार मुक्ताईनगरतर्फे निर्मलतारा हॉस्पिटल, मुक्ताईनगर येथे रेडक्रॉस सोसायटी रक्तपेढी जळगावच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. बोदवड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, जळगाव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष विलास धायडे, जळगाव जिल्हा भाजप चिटणीस राजू माळी, भाजपा तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, नंदूभाऊ हिरोळे, दीपक साळुंखे, डॉ.यशपाल जैन, अजय जैन, मान्यवर उपस्थित होते. प्रसंगी रक्तदात्यांकडून 51 बाटली रक्त संकलित करण्यात आले. रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी सागर बोदडे, अक्षय पालव, तुषार मानकरे, रोहित सुरवाडे, पवन पाटील, निलेश पाटील, सागर पाटील, राजू जाधव आदींनी परिश्रम घेतले. अजय जैन मित्र परीवारातर्फे बोदवड चौफुली येथे समाजातील वंचित मुलांना खाऊ वाटप आणि अन्नदान करण्यात आले.
मुक्ताईनगर ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप
जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगर भारतीय जनता पक्षातर्फे ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले. बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, मुक्ताईनगर नगराध्यक्ष नजमा तडवी, उपनगराध्यक्ष मनीषा पाटील, भाजपा जळगाव जिल्हा उपाध्यक्ष विलास धायडे, चिटणीस राजूभाऊ माळी, भाजपा तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, शहराध्यक्ष मनोज तळेल, योगेश कोलते, पांडुरंग नाफडे, पंचायत समिती दस्य विकास पाटील, चंद्रकांत भोलाने, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, नगरसेवक पियुष महाजन, बापु ससाने, ललित महाजन, डॉ.प्रदीप पाटील, मुकेश वानखेडे, निलेश शिरसाट, बबलू कोळी, दीपक साळुंखे, नंदू हिरोळे, निलेश मालवेकर, भैय्या पाटील आणि कार्यकर्ते उपस्थित होते.