अ‍ॅड. सचिन पटवर्धन यांची फेरनिवड

0

पिंपरीः शहरातील भाजपचे नेते अ‍ॅड. सचिन पटवर्धन यांची राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेल्या राज्यस्तरीय लेखा समितीच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. त्याबद्दल अ‍ॅड. सचिन पटवर्धन यांचा प्रदेश भाजपा आणि पिंपरी-चिंचवड भाजप पदाधिकार्‍यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा आमदार सुरेश हळवणकर, भाजप शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, भाजपा संघटनमंत्री मकरंदजी देशपांडे, प्रदेश कार्यकरीणी सदस्य सदाशिव खाडे, पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौर शैलाजा मोरे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित गोरखे आदी उपस्थित होते.