यावल-फैजपूर रस्त्यावरील घटना ; एक गंभीर
यावल– यावल फैजपूर रस्त्यावर दोन अॅपे रीक्षात समोरा-समोर धडक होवून तीन महिला प्रवासी जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी सात वाजता घडली. त्यातील दोघा महिलांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर यावल ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. गंभीर जखमी महिलांना जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.