अ‍ॅपे रीक्षावर टँकर आदळला : एक जण ठार, 11 जण जखमी

0

शेवाळी फाट्यावर अपघात ; अपघातानंतर टँकर चालक पसार

साक्री- उभ्या असलेल्या अ‍ॅपे रीक्षावर पाठीमागून आलेला भरधाव टँकर धडकून झालेल्या अपघातात एक जण ठार तर 11 जण जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास नंदुरबार-साक्री शेवाळी फाट्यावर घडली. प्रवासी वाहतूक करणारी अ‍ॅपे रीक्षा (क्र एम.एच. 18 डब्लू 8589) साक्रीकडे येत असताना शेवाळी फाट्यावर ती येऊन थांबली असता धुळयाकडून भरधाव वेगाने येणारा टँकर (क्र.ए.पी.16 ए.टी. 4277) आदळून पलटी झाला. या अपघातात रीक्षातील प्रवासी रायसिंग राजाराम गायकवाड (50, रा.महिर) हा जागीच ठार झाला तर रीक्षातील प्रवासी पिंटू आत्माराम मारनर (28, रा.इच्छापुर), सायजाबाई बाबूलाल सरक (30, रा.महिर),सयाबाई मुरा टिळे (55, रा.आयने), राजेंद्र तुकाराम माळचे (28, रा.अक्कलपाडा), वर्षा राजेंद्र माळचे (25, रा.अक्कलपाडा), शिवदास उखा शिंदे (40, रा.सय्यदनगर), विठ्ठल काशीराम गरदरे (30, रा.इच्छापुर), नाना लहानू गोयकर (32, रा.इच्छापुर), सुभाष काशीराम गरदरे (40, रा.इच्छापूर), भुरा काळू टिळे (60, रा.आयने), नानी(पुर्ण नाव नाही) तर ट्रँकर चालक जखमी झाला . अपघातातील जखमींवर डॉ.बी.पी.गोईल, डॉ.निखील वाघ, डॉ.अतुल देवरे, डॉ.शिंदे यांनी तातडीचे उपचार करून गंभीर जखमींना धुळे जिल्हा रुग्णालयात हलविले. साक्री पोलीस ठाण्यात या अपघाताची नोद करण्यात आली आहे. अपघातानंतर टँकर चालक पसार झाला. दरम्यान, अपघाताची खबर साक्री पोलिसांना कळताच वाहतूक पोलीस कर्मचारी रवींद्र ठाकरे व घुगरे यांनी धाव घेत जखमींना पीकअप वाहनातून साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.