यावल- तालुक्यातील साकळी गावाजवळ सोमवारी झालेल्या अपघातातील जखमी महिलेचा मंगळवारी उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. अमिनाबी गुलाम नबी शेख (50) असे मृत महिलेच नाव आहे. सोमवारी यावलकडून साकळी गावाकडे अॅपेरीक्षा (एम.एच. 19 ए.एफ.8471) ही प्रवासी घेवून जत असताना साकळी गावाजवळ चालकाचा रीक्षावरील नियत्रंण सुटले व रीक्षा रस्त्याच्या कडेला कलंडली. त्यात पाच जण जखमी झाले होते तर त्यातील अमिनाबी गुलाम नबी शेख (50, रा.साकळी) या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथोमपचार करून त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात हलवण्यात आले होते मात्र मंगळवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परीवार आहे. या अपघातात मंदा किरण सोनवणे (19), निराशा हिरामण सोेनवणे (32), पुष्पाबाई युवराज सोनवणे (50, रा.नावरे, ता.यावल) व संंदीप सुर्यभान पाटील (35, रा.किनगाव) हे चौघे किरकोळ जखमी झाले.