अ‍ॅम्बी व्हॅलीचा लिलाव होणार?

0

नवी दिल्ली : सहारा ग्रुपच्या पुणे येथील अ‍ॅम्बी व्हॅली टाऊनशिपच्या लिलावाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. अ‍ॅम्बी व्हॅलीच्या लिलावाला स्थगिती देण्यासाठी सहाराने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळल्याने सहारा ग्रुपला पैशांची जमवाजमव करण्यास वेळ कमी पडत असल्याने अ‍ॅम्बी व्हॅलीचा लिलाव होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.

पैसे जमवायला वेळ हवा
सहारा ग्रुपचे वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात अपिल केले होते की, अ‍ॅम्बी व्हॅली सेल नोटीसच्या पब्लिकेशनला स्थगिती द्यावी. गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पेमेंट प्लॅन रिव्ह्यूसाठी आणखी काही वेळ दिला जावा. लिलावाची प्रक्रिया सप्टेंबरपर्यंत रोखावी. यामुळे ग्रुपला सेबी-सहारा अकाउंटमध्ये जमा करावयाचे 1500 कोटी रुपयांची जमवाजमव करायला पुरेसा वेळ मिळेल.

7 सप्टेंबरपर्यंत मुदत
सर्वोच्च न्यायालयाने सहारा समूहाला 7 सप्टेंबरपर्यंत सेबीच्या अकाउंटमध्ये 1500 कोटी रुपये जमा करण्याचा आदेश दिला होता. तसेच जर सहाराने वेळेवर सर्वांचे पेमेंट केले, तर लिलावाची प्रक्रिया थांबवली जाईल. सहाराकडून न्यायालय इन्स्टॉलमेंट्सची वसुली करत आहे. आतापर्यंत सहाराने 16 हजार कोटी रुपये भरले आहेत.