अ‍ॅम्बी व्हॅलीच्या लिलावाची प्रक्रिया सुरू

0

मुंबई। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार बहुचर्चीत सहारा समूहाच्या मालकीच्या अँबी व्हॅलीच्या लिलावाची प्रक्रिया सुरु झाली आहे.लिलावासाठी या व्हॅलीची रिझर्व्ह किंमत 37,392 कोटी किंमत ठरवण्यात आली आहे. तर सहारा समूहाचे म्हणण्यानुसार या प्रकल्पाचे बाजारमुल्य 1 लाख कोटीपेक्षा जास्त आहे. सहारा समुहात देशभरातील लाखो गुंतवणूकदारांच्या ठेवी अडकल्या असून या ठेवी परत करण्याबाबत ही उपाययोजना आहे.

स्थगितीस नकार
अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने अ‍ॅम्बी व्हॅलीच्या लिलावावर स्थगिती देण्यास नकार दिला आहे. सहारा समूहाकडून अँबी व्हॅली लिलावाला स्थगिती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयानं ती याचिका फेटाळत अ‍ॅम्बी व्हॅलीच्या लिलावाला हिरवा कंदील दाखवला. काही दिवसांपूर्वी 300 कोटी रुपये डिपॉझिट करण्यात अपयशी ठरल्याने सर्वोच्च न्यायालयानंच सहाराच्या पुणे येथील अ‍ॅम्बी व्हॅलीतील संपत्तीचा लिलाव करण्याचा आदेश दिले होते. सहारा समूह आपल्या गुंतवणूकदारांच्या ठेवी परत करण्यात अपयशी ठरल्याने
सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय घेतला.