अ‍ॅम्बी व्हॅली लिलावाचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

0

नवी दिल्ली : गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यात सहारा समुहास अपयश आले असल्याने लोणावळ्यात सहारा समुहाने उभारलेल्या अ‍ॅम्बी व्हॅलीचा लिलाव करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला. सहारा समूहाने चांगला प्रस्ताव दिल्यास हा लिलाव टाळता येईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. तसेच, सहारा समूहाचे प्रमूख सुब्रतो राय यांना पुढील सुनावणीवेळी वैयक्तिकरित्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेशही दिेण्यात आले आहेत. या प्रकरणी 28 एप्रिलला पुढील सुनावणी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा सोमवाराचा आदेश हा सहारा समुहाला दणका मानला जातो. सहारा चिटफंड प्रकरणाची सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. सहाराने गुंतवणूकदारांचे सुमारे 14 हजार कोटी रुपये देणे आहे. त्यांपैकी 5 हजार कोटी रुपये 17 एप्रिलपर्यंत जमा करण्याचे आदेश न्यायालयाने 6 फेब्रुवारीस दिले होते. तसेच, ही रक्कम जमा न केल्यास अ‍ॅम्बी ह्वॅलीचा लिलाव करून ही रक्कम वसूल केली जाईल, असा इशाराही न्यायालयाने दिला होता. गुंतवणूकदारांची रक्कम सर्वोच्च न्यायालयाच्या निबंधकाच्या खात्यात जमा करण्याऐवजी सेबी-सहाराच्या संयुक्त खात्यात जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

सहारा समुहाच्या ज्या संपत्तीवर कर्ज नाही, अशा संपत्तीची यादीही सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. सहाराला 17 एफ्रिलपर्यंत पाच हजार कोटी रुपये न्यायालयात जमा न करता आल्याने न्यायालयाने सोमवारी अ‍ॅम्बी व्हॅलीच्या लिलावाचे आदेश दिले. या प्रकरणाची पुढील सुमावणी 28 एप्रिललला होमार असून, त्यावेळी न्यायालय कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.